नमस्कार ,मी प्रशांत भोयर ,माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की , मी श्री संत रुख्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,कुही ,या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्राचार्य म्हणून कार्यरत आहे . आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात कौशल्याधारीत शिक्षणाची गरज वाढत आहे . आपल्या संस्थेचा उद्देश केवळ तांत्रिक ज्ञान देणे नाही ,तर विद्यार्थ्यांना कुशल ,आत्मनिर्भर आणि देशाच्या विकासात योगदान देणारे नागरिक घडविणे हा आहे . विद्यार्थ्यांनो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करा . प्रामाणिकपणा ,शिस्त आणि चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे . आमचे निदेशक आणि कर्मचारी नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहेत . मी तुम्हाला आश्वासन देतो की ,संस्थेच्या प्रगतीसाठी ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू . आपल्या सहकार्याने उंचीवर नेऊ ,असा मला पूर्ण विश्वास आहे.
[:]