Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Gadchiroli
Email dveto.gadchiroli@dvet.edu.in
Phone 9567456345
About - GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE , KURKHEDA TAH: KURKHEDA DIST: GADCHIROLI
 
प्राचार्यांचे मनोगत :-
तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून  भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल करणारी पिढी घडविण्याचे काम आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये होत आहे. भविष्यातील स्वप्ने साकार होण्यासाठी भविष्यकाळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत  पारंपारिक  शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत . अश्या परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसायांचे कौशल्य  शिकविणारे  प्रशिक्षण हे  रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदानच आहे. प्रशिक्षण कालावधीत कौशल्य विकसित होण्याचे दृष्टीने विविध मॉडेल तयार करणे, विविध विविध कारखान्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, उद्योगधंद्यातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्ह्यु आयोजित करणे, व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे दृष्टीने प्रशिक्षण देणे, तसेच प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे या सारखे विविध उपक्रम आमच्या संस्थेत राबविले जातात. अशाप्रकारे आमच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत रोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेमध्ये पुढील सत्राकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक  विद्यार्थी व पालकांनी  केव्हाही संस्थेमध्ये संपर्क साधावा, अथवा दिलेल्या भ्रमणध्वनि  क्रमांकावर संपर्क करावा. आपले मार्गदर्शन करण्यास आमची टिम सदैव तत्पर राहील. आपल्या उज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा....!
संस्थेची वैशिष्टे:-
 
  • गडचिरोली  जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षणात नामांकित तसेच अग्रगण्य संस्था
  • संस्थेची स्वत:ची भव्य इमारत व सुसज्ज कार्यशाळा.
  • अनुभवी व प्रशिक्षित निदेशक वर्ग आणि शिस्तपूर्वक वातावरणात प्रशिक्षण.
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा.
  • रोजगार व स्वयंरोजगाराच्या  दृष्टीने मार्गदर्शन शिबीर तसेच कॅम्पस इंटरव्ह्यु चे आयोजन.
  • व्यक्तिमत्व विकासाकरिता विविध कार्यशाळा, चर्चासत्राचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन. (उदा. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, योगासन शिबीर, स्वच्छता परिपाठ, वृक्षारोपण, श्रमसंस्कार शिबीर, सांस्कृतिक व पारंपरिक क्रीडास्पर्धांचे आयोजन, व्यक्तिमत्व विकास व मुलाखत मार्गदर्शन)
  • आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांकरिता वसतिगृहाची सोय उपलब्ध.
  • गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचा वाटा. 
  COURSE DETAILS :-
Sr. No. Trade / Course Name Engg. / Non Engg. Intake Capacity Admitted Trainee Current Year Trainees On Roll Previous Year
1 ELECTRICIAN ENGG 40 40 40
2 ELECTRONICS MECH ENGG 24 24 24
3 MECH. DIESEL ENGG 48 48 48
4 PUMP OPERATOR CUM MECHANIC ENG 20 20 20
5 SEWING TECHNOLOGY NON ENG 20 18 20
6 DRESS MEKING NON ENG 20 16 20
  TOTAL TRADES:  06             TOTAL UNITS:   08          TOTAL INTAKE:      172
  Basic Details:
Year of Establishment: 1984
Establishment GR: ITI-196/(208)/VYA.SHI-1,  DT. 09 AUG 1996
 Institute Code: 2745081010
 NCVT MIS CODE : GR27000334
Institute Category : TRIBAL
Final DGET Grade: 6.90
Contact Details :
Institute Address : NEAR PWD REST HOUSE, TALEGAON ROAD, KURKHEDA,TAH- KURKHEDA, DIST- GADCHIROLI, (MAHARASHTRA). 441209
Phone No : 9422912197
Email ID : iti.kurkheda@dvet.gov.in
Hostel Information:
Intake Capacity 50
Girls:    NA
Boys: Yes
About Principal
Events
  • 11 Apr
    महात्मा ज्योतिबा फुले जयंती
  • 12 Jan
    राष्ट्रीय युवा दिन
  • 11 Jan
    सांस्कृतिक कार्यक्रम
  • 03 Mar
    पारंपरिक-क्रीडा