| संस्थेबाबत | : संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर, ता. भिवापूर जि. नागपूर |
| स्थापना वर्ष | : १९९७ |
| संस्था निर्मितीचा शासन निर्णय क्र. | : आय.टी.आय.१०९७/(७१३)/व्यशि-१ दि. ०४ ऑगस्ट १९९७ |
| संस्था कोड | : २७४५०५१००५ |
| एन.सी.व्ही.टी.एम.आय.एस. कोड | : GR27000447 |
| संस्था प्रवर्ग (Institute Category) | : जनरल |
| डी.जी.ई.टी. अंतिम गुणांकन | : ७.७० |
| संस्थेचा पत्ता | : संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम आय डी सी एरिया, तास, भिवापूर, ता. भिवापूर जि. नागपूर ४४१२०१ |
| फोन नं. | : ०७१०६-२५१४४८/२९९४२६ |
| ई मेल | : iti.bhivapur@dvet.gov.in |
| वसतिगृह माहिती | : क्षमता : ५० मुलांकरिता: ५० |
| संस्थेत शिकविले जाणारे अभ्यासक्रम | ||||||
| अ.क्र. | व्यवसाय अभ्यासक्रमाचे नाव व प्रशिक्षण कालावधी | अभियांत्रिकी/ गैरअभियांत्रिकी | एकूण तुकड्यांची संख्या | संस्थेत एकूण उपलब्ध जागा | सत्र २०२४-२०२५ करिता उपलब्ध जागा | सत्र २०२४-२०२५ मधील प्रवेशित प्रशिक्षणार्थी |
| १ | विजतंत्री ( २ वर्षे ) | अभियांत्रिकी | २ | ४० | २० | २० |
| २ | प्रशितन व वातानुकुलीकरण तंत्रंज्ञ ( २ वर्षे ) | अभियांत्रिकी | २ | ४८ | २४ | २४ |
| ३ | नळ कारागीर ( १ वर्षे ) | अभियांत्रिकी | १ | २४ | २४ | २४ |
| एकूण | ५ | ११२ | ६८ | ६८ | ||
नमस्कार, मी चंद्रशेखर राऊत माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की, मी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,भिवापूर या प्रतिष्ठित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्राचार्य म्हणून कार्यरत आहे.आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात कौशल्याधारित शिक्षणाची गरज वाढत आहे. आपल्या संस्थेचा उद्देश केवळ तांत्रिक ज्ञान देणे नाही, तर विद्यार्थ्यांना कुशल, आत्मनिर्भर आणि देशाच्या विकासात योगदान देणारे नागरिक घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करा. प्रामाणिकपणा, शिस्त आणि चिकाटी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आमचे निदेशक आणि कर्मचारी नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहेत. मी तुम्हाला आश्वासन देतो की, संस्थेच्या प्रगतीसाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. आपल्या सहकार्याने आणि एकजुटीने आपण संस्थेला नव्या उंचीवर नेऊ, असा मला पूर्ण विश्वास आहे.
| दृष्टीकोन (VISION) | • संघ बांधणी |
| • सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये असणाऱ्या बहुविध कौशल्याचा योग्य उपयोग करून घेणे | |
| • प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मॉडेलची निर्मिती करून त्यांच्यामधील संशोधनात्मक संकल्पनांना वाव देणे | |
| • सरकारी अनुदानाचा योग्य वापर आणि खर्चावर नियंत्रण | |
| • योग्य प्रशासनाकरिता वार्षिक कार्य तक्ता तयार करून विविध कालावधीत अंमलबजावणी करणे | |
| • संस्थेच्या विकासाकरिता नाविण्यपूर्ण संकल्पना राबविणे |
| ध्येय (GOAL) | |
| • महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालया अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार उद्योगाच्या गरजेची सुसंगत नवीनतम अभ्यासक्रम तयार करणे | |
| • प्रशिक्षणासाठी आणि व्यावसायिक विभागातील उत्तम शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी उद्योग-संस्था परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे | |
| • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती आणि समाजातील इतर सामाजिक दृष्ट्या वंचित गटांमध्ये समान प्रवेश आणि संधी प्रदान करणे | |
| • समर्पित टीमवर्क आणि समाजाच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्याकरिता कार्य करणे |