प्राचार्यांचे मनोगत :- |
तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल करणारी पिढी घडविण्याचे काम आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये होत आहे. भविष्यातील स्वप्ने साकार होण्यासाठी भविष्यकाळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पारंपारिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत . अश्या परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसायांचे कौशल्य शिकविणारे प्रशिक्षण हे रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदानच आहे. प्रशिक्षण कालावधीत कौशल्य विकसित होण्याचे दृष्टीने विविध मॉडेल तयार करणे, विविध विविध कारखान्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, उद्योगधंद्यातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्ह्यु आयोजित करणे, व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे दृष्टीने प्रशिक्षण देणे, तसेच प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे या सारखे विविध उपक्रम आमच्या संस्थेत राबविले जातात. अशाप्रकारे आमच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत रोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेमध्ये पुढील सत्राकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी व पालकांनी केव्हाही संस्थेमध्ये संपर्क साधावा, अथवा दिलेल्या भ्रमणध्वनि क्रमांकावर संपर्क करावा. आपले मार्गदर्शन करण्यास आमची टिम सदैव तत्पर राहील. आपल्या उज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा....! |
संस्थेची वैशिष्टे:- |
|
Sr. No. | Trade / Course Name | Engg. / Non Engg. | Intake Capacity | Admitted Trainee Current Year | Trainees On Roll Previous Year | ||||||||||||||||||||||||||||||
1 | ELECTRICIAN | ENGG | 40 | 40 | 40 | ||||||||||||||||||||||||||||||
2 | ELECTRONICS MECH | ENGG | 24 | 24 | 24 | ||||||||||||||||||||||||||||||
3 | MECH. DIESEL | ENGG | 48 | 48 | 48 | ||||||||||||||||||||||||||||||
4 | PUMP OPERATOR CUM MECHANIC | ENG | 20 | 20 | 20 | ||||||||||||||||||||||||||||||
5 | SEWING TECHNOLOGY | NON ENG | 20 | 18 | 20 | ||||||||||||||||||||||||||||||
6 | DRESS MEKING | NON ENG | 20 | 16 | 20 | ||||||||||||||||||||||||||||||
TOTAL TRADES: 06 TOTAL UNITS: 08 TOTAL INTAKE: 172
|