Nagpur About US

                 जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , नागपूर अंतर्गत नागपूर , नागपूर (ग्रा.) ,हिंगणा , कळमेश्वर , काटोल , नरखेड , सावनेर , पारशिवनी , रामटेक , कामठी , कुही , मौदा , भिवापुर , उमरेड इत्यादी 14 तालुके आहेत त्यापैकी रामटेक तालुक्यात देवलापार व बेलदा हे आदिवासी क्षेत्र समाविष्ठ आहे.

              नागपूर जिल्हयात सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मुलींकरीता 01 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर , अनुसूचित जाती करिता 01 शासकीय उच्चस्त्र अनुसूचित जाती व नवबौध्दा मुला-मुलींकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था , इंदोरा , 01 आदिवासी आश्रमशाळा बेलदा , 11 शासकीय तंत्र माद्यमिक शाळा केंद्र , 01 मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र व 01 प्रगत व्यवसाय प्रशिक्षण संस्था इत्यादी कार्यान्वीत आहेत.

              अशासकीय संस्थेअंतर्गत 73 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , 62 अधिक 2 स्तरावरील उच्च माद्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम , 149 अधिक 2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळा अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहामाही , एक व दोन वर्ष अशा एकुण 101 कार्यान्वीत संस्था कार्यरत आहेत. उपरोक्त सर्व योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना प्रशिक्षण देण्यांत येते. या सर्व संस्थाचे पर्यवेक्षण या कार्यालयाद्वारे करण्यात येते.

    त्यामुळे राज्यातील व नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बुट्टीबोरी, हिंगणा येथील औद्योगिक आस्थापनांना तसेच नागपूर येथील महत्वकांक्षी मिहान, मेट्रो रेल या प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यांचे उद्यिष्ठ पुर्ण केल्या जात आहे..