व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत खालील योजना राबविण्यात येतात
1. शिल्पकारागिर प्रशिक्षण योजना
2. +2 स्तरावरील उच्च् माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना
3. +2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम योजना
4. पुर्व व्यवसायिक अभ्यासक्रम योजना
5. अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम योजना
6. शिकाउ उमेदवारी योजना (आयटीआय / +2 स्तरावरील उच्च् माध्यमिक व्यवसायअभ्यासक्रम )
7. आर्टिझन टु टेक्नोक्रॅट
8. मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र
9. शिल्प कारागिर प्रशिक्षण योजना
10. ( औदयोगिक प्रशिक्षण संस्था )
युवकांना रोजगार / स्वंयरोजगारारसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण्ण या मार्फत युवकांना कुशल व अर्धकुशल कारागिराचे निर्मितीसाठी प्रशिक्षण औदयोगिक प्रशिक्षण संस्था मधून दिले जाते. जिल्हयात 8 शासकीय व 14 अशासकीय खाजगी औ.प्र.संस्था असून शासकीय संस्थेची प्रवेश क्षमता 1089 असून अशासकीय संस्थेची 1036 आहे.
शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था मध्ये सन 2018-19 साठी 1387 प्रवेशित असून अशासकीय संस्थेत 1126 आहे.
पुर्व व्यवसायिक अभ्यासक्रम

इ. 9 वी व 10 वी च्या स्तरावर विदयार्थ्याना भविष्यातील शिक्षणाविषयी व्यापक दृष्टीकोन व अभियांत्रिकी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याकरीता विदयार्थ्याना पुर्व व्यवसायिक अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये सद्यस्थितीत 1. इलीमेंटस ऑफ मेक्यानिकल इंजिनियरिंग 2. इलिमेंटस ऑफ इलेक्ट्रानिक्स ॲड इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (व्ही-2 ) असे दोन अभ्यासक्रम 04 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रामधून राबविले जातात.व बेसिक टेक्नॉलॉजी (व्ही-1) हा अभ्यासक्रम एका अशासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रातून राबविण्यात येते. प्रवेश क्षमता शासकीय 480 असून अशासकीय संस्थेची 120 आहे व एका बेसिक टेक्नॉ. 60 अशी आहे. खाजगी संस्था यंत्र सामुग्री घेणे परवडत नसल्यामूळे शासकीय तंत्र माध्यमिक शाळा मध्ये यंत्रसामुग्री घेवून कार्यशाळेची उभारणी केली जाते व प्रशिक्षणाकरीता सहभागी शाळा खाजगी अनुदानित संस्था मधील इ. 9 वी व 10 वी च्या विदयार्थ्याना शासकीय संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो.
+ 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
(एमसीव्हिसी )

इ.11 व इ.12 वी च्या स्तरावर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व रोजगार आणि स्वंयरोजगारा करीता उपयुक्त व्यवसायाभिमुख प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातुन युवकांना दिले जाते .जिल्हयात 02 शासकीय व 20 अशासकीय अनुदानित संस्था आहे. त्याची प्रवेश क्षमता शासकीय 180 असून अशासकीय अनुदानित संस्थेची 1900 एवढी आहे. सन 2018-19 मध्ये शासकीय संस्थेत 132 प्रवेश असून अशासकीय संस्थेमध्ये 1336 प्रवेश झालेले आहे.एकुण प्रवेश 1468 आहे.

+ 2 स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम
इ.11 वी व इ.12 वी च्या स्तरावर विदयार्थ्याना उच्च शिक्षणाकडे जाता यावे व काही विदयार्थ्याना रोजगार / स्वंयरोजगाराकडे जाता यावे याकरीता द्विलक्षी व्यवसय अभ्यासक्रमयोजना राबविली जाते. जिल्हयात 02 शासकीय व 05 अशासकीय अनुदानित व 22 विना अनुदानित संस्था मधून योजना राबविली जाते प्रवेश क्षमता अनुक्रमे शासकीय 350 असून अशासकीय अनुदानित संस्थेची 400 व अशासकीय विनाअनुदानित संस्थेची 1700 एवढी आहे. सन 2018-19 मध्ये शासकीय संस्थेमध्ये 191 तर अशासकीय अनुदानित संस्थेत 275 व अशासकीय विना अनुदानित संस्थेत 871 प्रवेश झालेले आहेत
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
महाराष्ट् राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ , मुंबई यांचे मार्फत 6 महीने / 1 वर्ष / 2 वर्ष या कालावधीचे अभ्यासक्रम म.रा.व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ यांचे मार्फत राबविले जातात. जिल्ह्रयामध्ये 05 संस्था असून एकूण प्रवेश क्षमता 150 आहे. सन 2018 मध्ये एकूण 110 विदयार्थ्यानी प्रवेश घेतलेला आहे.
योजना निहाय अभ्यासक्रम राबविणा-या संस्थाची संख्या (गोषवारा)
प्रवेश क्षमतेनिहाय स्थिती

अ.ककक क्र
योजना संस्थाची संख्या प्रवेश क्षमता प्रवेश
शासकीय अशासकीय शासकीय अशासकीय शासकीय अशासकीय
अनुदानित विना
अनुदानित
एकूण
अनुदानित विना
अनुदानित
एकूण अनुदानित विना
अनुदानित एकूण
1 शिल्प कारागिर प्रशिक्षण 8 0 14 22 1089 0 1036 2125 1387 0 1126 2513
1 पुर्व व्यावसायिक 4 1 0 5 480 120 00 600 523 82 00 605
2 उच्च माध्यमिक
व्यवसाय अभ्यासक्रम
(एमसीव्हिसी) 2 20 0 22 180 1900 00 2080 132 1336 00 1468
3 द्विलक्षी
अभ्यासक्रम 2 5 22 29 350 400 1700 2450 191 275 871 1337
4 प्रमाणपत्र अभ्यासक्रम 0 0 5 5 0 0 150 150 0 0 110 110
5 शिकाउ उमेदवारी योजना 1 0 0 1 776 0 0 776 367 0 0 367
एकूण 17 26 41 84 2875 2420 2886 8181 2600 1693 2107 6400