संस्थेचे नामकरण

शासकीय औद्योगिक संस्था नरखेड या संस्थेचे नामकरण दिनांक १ फेरवारी २०२५ रोजी मा.ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे,पालक मंत्री यांचे शुभ हस्ते आणि मा.श्री चरणसिंग ठाकूर ,आमदार यांचे प्रमुख उपस्थित श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक संस्था नरखेड म्हणून झाले.या कार्यक्रमात संपूर्ण नरखेड परिसर अमृतमय झाले .२० दिंडी मध्ये ५०० वारकरी यांनी श्री अमृत महाराज यांची पालकी द्वारा संस्थेत उपस्थित झाले.