Nagpur About US
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नागपूर अंतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे सहा जिल्हे आहेत, पैकी गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे संपूर्ण आदिवासी नक्षलग्रस्त असून भंडारा व चंद्रपूर जिल्हयांचा काही भाग नक्षलग्रस्त क्षेत्रात समाविष्ट आहे. तसेच डावी कडवी विचारसरणी योजनेअंतर्गत LWE केंद् व राज्य शासन हयांचा हिस्सा असलेली औ प्र संस्था,पालांदुर ता देवरी जि गोंदिया व जिमलगटृटा जि गडचिरोली येथे सुरु करण्यांस मान्यता मिळालेली आहे.
आदिवासी घटक अत्यंत दुर्बल असून विशेषत: अनुसूचित जाती, जमाती व विमुक्त जाती यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विहित संबधाकडे विशेष लक्ष देण्यासाठी व त्यांचा विकास करण्याकरीता आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे होण्यासाठी आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजनेतंर्गत व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण अंतर्गत वेग-वेगळया योजना कार्यान्वित आहेत.
या विभागांतर्गत् शासकीय 78 औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 31 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र कार्यान्वित आहेत. तसेच अशासकीय 159 औ.प्र.संस्था व 168 कनिष्ठ महाविद्यालयामधून + 2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम विविध गटांमधून चालविल्या जात आहेत. व्यवसायाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थाची संख्या 120 आहे. तसेच एम.ई.एस. अंतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम लोकसेवा केंद्र, मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण, सुवर्ण जयंती रोजगार प्रशिक्षण,अल्पसंख्यांक उमेदवारांन अल्प मुदतीचे अभ्यासक्रम व विविध योजनांच्या माध्यमातून जवळजवळ 75,601 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बुटीबोरी, हिंगणा येथील कारखान्यात तसेच नागपूर येथील महत्वाकांक्षी मिहान प्रकल्प यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्याचे उदिष्ट पूर्ण केल्या जात आहे.